Description
मुळ गौरी गीत:ऊठ, ऊठ माळीदादा, बैलं जूप रहाटालाबैलं जूप रहाटालारे, पाणी जाऊ दे पाटाला -धृएवढं पाणी कशाला, खारकीच्या देठालाएवढ्या खारका खारका कशाला, गौरीईच्या वौशालागौरीईचा वौसा गं, फुलांनी दरवळलाफुलांनी दरवळळा गं, उदांनी परिमळला-१उठ, उठ माळीदादा, बैलं जूप रहाटालाबैलं जूप रहाटाला रे, पाणी जाऊ दे पाटालाएवढं पाणी कशाला, वाळकीच्या देठालाएवढी वाळकं कशाला, गौराईच्या वौशालागौराईचा वौसा गं, फुलांनी दरवळलाफुलांनी दरवळला गं, उदांनी परिमळला-२उठ, उठ माळीदादा, बैलं जूप रहाटालाबैलं जूप रहाटाला रे, पाणी जाऊ दे पाटालाएवढं पाणी कशाला, बदामाच्या देठालाएवढं बदाम कशाला, गौराईच्या वौशालागौरीईचा वौसा गं, फुलांनी दरवळलाफुलांनी दरवळला गं, उदांनी परिमळला-३