उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे . उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे . हा उपवासाचा खरा अर्थ आहे . उपवास करणे म्हणजे उपवाशी राहणे नव्हे. आपण काय करतो दिवसभर उपवास करतो .उपवासाच्या नावाने भात, भाकर , चपाती व भाज्या खात नाही थोडक्यात रोजचं जेवण घेत नाही पण फराळाच्या नावाने अगदी दिवसभर चरत असतो. पोटात अजिबात जागा शिल्लक ठेवत नाही. अति खाणं झालं की सुस्ती येते मग देवाचं नाम कसं आठवेल अजिबात आठवत नाही. तर देवाच्या जवळ जाणे रहाणे दूरच रहाते . आमची एकादशी आणि दुप्पटं खाशी अशी अवस्था असते. म्हणून एकादशीचा खरा गूढार्थ समजून घेण्यासाठी हा सर्व खटाटोप चालला आहे.#lokmatbhakti #AshadhiEkadashi #AshadiFast #pandharpurwari Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा