गुरुवारी मालाडच्या मालवणी व फोर्ट या दोन भागांत इमारत कोसळण्याच्या दोन घटनांत 7 जणांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाले. एकूण 38 जणांना वाचवण्यात आलाय. तर ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. मुसळधार पावसात इमारत कोसळण्याच्या दोन घटनांनी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सात वर्षांमध्ये ३ हजार ९४५ इमारती किंवा त्यांचे भाग कोसळून झालेल्या दुर्घटनांत तीनशे निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. मात्र या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने अन्य पावसाळा पूर्व कामे लांबणीवर पडल्याने धोकादायक इमारतींचा धोका अधिकच वाढला. तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat