नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि. १८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. यावेळी भरपावसातही रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, मनसे व राष्टवादी तसेच छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडत तसेच फलक दाखवून विरोध नोंदविला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा सायंकाळी नाशिकमध्ये पोहोचली. तेव्हा पाथर्डी फाटा येथे फडणवीस यांचे ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. पाच हजार दुचाकीस्वार भाजपचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. पालकमंत्री गिरीश महाजन, महाराष्ट प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत मुख्यमंत्र्यांसमवेत रथावर आरूढ झाले होते. आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!#LokmatNews #DevendraFadnavis # MahaJandeshYatraमित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19