विधानसभा निवडणुकीला युती सामोरी जाणार असल्याचं शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांचे नेते निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election) सर्व 288 मतदारसंघांची चाचपणी भाजपने सुरु केल्याची माहिती आहे.भाजपने 288 विधानसभा मतदारसंघात आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. या मतदारसंघांमधील इच्छुकांची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.प्रत्येक मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, त्या मतदारसंघात कोण प्रबळ दावेदार आहे, याची चाचपणी करत असल्याची कबुली भाजप आमदार गिरीश व्यास यांनी दिली आहे. उमेदवारांबाबतचं सर्वेक्षण सर्वच राजकीय पक्ष करतात, त्यात वावगं काहीच नाही, असंही व्यास म्हणाले. या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार निश्चित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न जनतेसमोर येण्याचा उद्भवत नाही, असंही गिरीश व्यास यांनी स्पष्ट केलं. युती असो वा महायुती देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यास यांनी बोलून दाखवला.आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!#LokmatNews #MumbaiSubscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19