मुलगी झाली हो या मालिकेतील माऊचा भाऊ रोहन याने एक गुड न्यूज देत चाहत्यांना खुश केलंय. महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीच्या परिक्षेचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्टला लागला. रोहन म्हणजे अभिनेता सृजन देशपांडेनेदेखील कला शाखेची १२वीची परिक्षा दिली होती. आणि तो ८७ टक्के मिळवून पास झालाय.पहा त्याची ही मार्कशीट. सृजनला इंग्रजीमध्ये सर्वात जास्त ९२ मार्क मिळाले आहेत. तो फ्रेंच भाषा शिकत होता. त्याला या विषयात ८५ मार्क मिळाले आहेत. गेल्या वर्षी सृजनने मुलगी झाली हो मालिकेचं शूटींग आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत पार पाडली होती. त्याच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. सृजन, मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर बरीच मस्ती करतो. तो सेटवरचे हे फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असतो. पहा हे फोटो. #MulgiZaliHo #SrujanDeshpande #Rohan #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber