Swara Bhaskar : पूजा, वास्तुशांती करणारी स्वरा होतेय ट्रोल | Social Media | Sakal Mediaबॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतंच रिडेव्हलपमेंट झालेल्या घरात गृहप्रवेश केला... यावेळी पुजाऱ्याकडून तब्बल 7 तास सात प्रकारची पूजा करण्यात आली... यामध्ये गणेश पूजा, सत्यनारायण पूजा, रुद्राभिषेक आणि शेवटी हवन करुन गृहप्रवेश करण्यात आला... स्वरा भास्करने स्वत: या पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.. आणि याच फोटोंवरुन नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय... हिंदूविरोधी वक्तव्य आणि हिंदूंचा विरोध करणाऱ्यांचं समर्थन करताना अनेकदा स्वराला पाहण्यात आलंय.. डाव्या विचारसरणीची स्वरा अशी तिची ओळख आहे... त्यामुळे तिने केलेल्या पूजा पाठमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.. हिंदूविरोधी म्हणून स्वराची ओळख आहे आणि तीने हिंदू दहशतवादासारखे शब्ददेखील वापरले होते.. नुकतंच अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर स्वराने, वादग्रस्त ट्विट केलं होतं... ज्यामुळे हिंदू आयटी सेलने तिच्याविरोधात तक्रारसुद्धा केली होती...#SwaraBhaskar #Bollywoodactress #grihapravesh #newoldhouse #NewBeginnings