एक छोटीशी चूक आपल्याला इतकी महागात पडेल, याचा विचारही अक्षय कुमारने केला नव्हता. त्यातही चूक अशीही थेट पोटावर लाथ पडायची. पण अक्षयच्या हाताने ही चूक झाली आणि मग काय, या चुकीसाठी त्याला पत्नी ट्विंकल खन्नाची ट्विटरवरून जाहीरपणे माफी मागावी लागली.आता हे चुकीचे नेमके प्रकरण काय, ते आम्ही तुम्हाला सांगतो. तर अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या सिनेमाला कालच दोन वर्षे झालीत. त्यानिमित्त काल अक्षयने सोनम कपूर व राधिका आपटेसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत आनंद व्यक्त केला होता. ‘ पॅडमॅन या सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झालीत. ज्या मुद्यावर लोक बोलायला कचरतात, त्याच मुद्यावर आम्ही एक सिनेमा बनवला, याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की, गरीबी आणि मासिक पाळीसंदर्भातील कालबाह्य विचार आपण समूळ नष्ट करू शकू,’ असे अक्षयने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले.#Akshaykumar #Twinklekhanna #Lokmat #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber