मला आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी कारस्थान रचणे सुरू झाले आहे आणि यासंदभार्तली ऑडीओ क्लीप व्हायरल झाली, असा गाैप्यस्फोट आज महापाैर संदीप जोशी यांनी केला. पालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. गंपावार यांच्या निलंबनावरुन प्रशासन आणि सत्ताधारी असा वाद सुरू आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपने महापालिका वर्तुळासह शहरात खळबळ उडवून दिली. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या या वाईट प्रकाराविरोधात भाजयुमोतर्फे आज नागपुरच्या संविधान चाैकात आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)#Nagpur #Politics #Maharashtra